न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

भूमीगत वाहिन्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर वीज समस्या कायमच्या संपतील : प्रमोद जठार

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

पूर्वीच्या सरकारमध्ये महाराष्ट्रात १४-१४ तास लोडशेडींग व्हायचं. मात्र, भाजपची सत्ता आल्यानंतर देशात अन् राज्यात आपण स्वयंपूर्ण झालो आहोत. ‘वन नेशन, वन ग्रीड’ अंतर्गत सगळी ग्रीड एकमेकांना जोडली गेलीत. वीजेचे आताचे प्रश्न झाड, फांद्या पडल्याने होत आहेत‌. ते सुद्धा मार्गी लागतील. येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा मांडला जाईल. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार भूमीगत वाहिन्यांचे काम कोकणात सुरू असून ते पूर्णत्वास आल्यानंतर वीज समस्या कायमच्या संपतील. तक्रारी करण्यासाठी नाही तर समस्या सोडविण्यासाठी आपण आहोत अस मत भाजप आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केले. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या पुढाकारातून आज शुक्रवारी सावंतवाडीत आयोजित वीज समस्या बैठकीत मार्गदर्शन करताना जठार बोलत होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर, आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, मोहिनी मडगावकर, दिपाली भालेकर, आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, निलम नाईक, दुलारी रांगणेकर, सुकन्या टोपले, सुनिता पेडणेकर, ॲड.सिद्धार्थ भांबुरे, विलास जाधव, संदीप सावंत, राजू पनवेलकर, दादा मडकईकर, दिलीप भालेकर, संतोष गांवस, दत्तप्रसाद गोठसकर, डॉ. मधूकर घारपुरे, महेश खानोलकर, मनोज घाटकर आदी उपस्थित होते.
आमदार जठार पुढे म्हणाले, सावंतवाडीतील नागरिक, पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या समस्या मांडल्या आहेत. आचारसंहितेमुळे अधिकारी आले नाहीत. तरीही उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या माध्यमातून दर महिन्याला वीज वितरणच्या कामाचा पाठपुरावा केला जाणार आहे. यातून जनतेच्या समस्या सोडवल्या जातील. कोकणात अंडरग्राऊंड वीज वाहिन्या झाल्यानंतर वीज तुटण्याचा प्रश्न येणार नाही. अपारंपारिक उर्जा, सोलारसह अनेक नवीन प्रयोग सरकार वीज निर्मितीसाठी करत आहेत. वीज स्वयंपूर्ण होण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. लोडशेडींग राहणार नाही यासाठी आम्ही काम करणार असून येणाऱ्या अधिवेशनात याबाबत मुद्दे मांडू, असे श्री. जठार म्हणाले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे