न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मराठवाड्यासह विदर्भात पेट्रोलसाठी हाणामारी… बळीराजा हवालदिल

बुलढाणा/

राज्यात इंधन टंचाईमुळे राज्यात नवं संकट उभं ठाकलंय.आधीच इंधनांचे भाव वाढलेले असतानाच आता इंधन तुटवड्याचाही सामना सर्वसामान्यांना करावा लागतोय. पेट्रोल पंपावरील इंधन तुटवड्यामुळे हिंगोलतल्या शेतकऱ्यांची काय अवस्था झालीय पाहा, अशी परिस्थिती इतरही जिल्ह्यांमध्ये आहे. राज्यातल्या विविध जिल्ह्यांत इंधन तुटवड्यामुळे काय परिस्थिती निर्माण झालीये पाहूयात.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे डिझेल भरण्यावरून तुंबळ हाणामारी झाली. वाशिममध्येही अकोला नाका परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल घेण्याच्या वादातून तुफान हाणामारी झाली.

हिंगोली जिल्ह्यातही इंधन टंचाईच्या संकटामुळे संतप्त शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपावरच ठिय्या मांडला. जालन्यातही भीषण इंधन टंचाई निर्माण झालीय.अनेक पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’चे फलक लागले.

परभणी जिल्ह्यातही ग्रामीण भागातील अनेक पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे फलक लागले. दुसरीकडे नंदुरबारच्या धडगावमध्ये इंधन संपणार अशा अफवेने मोठा गोंधळ निर्माण झाला.

इंधन मिळावं म्हणून हिंगोलीत एका शेतकऱ्यानं पेट्रोल पंपमालकाचे अक्षऱशः पाय धरलेत. ((आपल्याकडे व्हिज्युअल्स आहेत)) इंधन तुटवड्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केलाय.

“

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे