न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

निरोगी जीवनासाठी आरोग्याची नियमित तपासणी करणे गरजेचे: पोलीस निरीक्षक पंकज शिंदे

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

   आरोग्य ही प्रत्येक व्यक्तीची खरी संपत्ती आहे. निरोगी जीवन जगण्यासाठी आरोग्याची नियमित तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. आजार अंगावर न काढता त्याची वेळीच तपासणी करून योग्य उपचार घेणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांनी केले. बांदा येथे बांदा मराठा समाज व बांदेश्वर आय क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी श्री. पंकज शिंदे बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ, माजी उपाध्यक्ष आनंद गवस, माजी अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत, डाॅ. संजय केसरे, डाॅ.सौ. जयश्री केसरे,पंचायत समिती सदस्या सौ.ऋतिका नाईक, बांदा मराठा समाजाचे मुख्य प्रवर्तक गुरूनाथ सावंत, सुरेश परब, दासा गवस, बांदा मराठा समाज अध्यक्ष परिमल सावंत, मंडळाचे सल्लागार दिपक सावंत,महीला मराठा अध्यक्षा सौ. स्वाती सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे बांदा मराठा समाज पदाधिकारी सदस्यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

श्री. पंकज शिंदे म्हणाले, बांदा मराठा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले आरोग्य शिबीर हा अत्यंत स्तुत्य आणि समाजोपयोगी उपक्रम आहे. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेकदा दैनंदिन कामकाजाच्या व्यापामुळे नागरिक स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आजारांचे वेळीच निदान होत नाही आणि भविष्यात त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. अशा परिस्थितीत आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेण्याची संधी उपलब्ध होत असते. बांदा मराठा समाजाने सामाजिक बांधिलकी जपत आयोजित केलेल्या या आरोग्य शिबिराचा परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारचे आरोग्यविषयक आणि समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविणे ही काळाची गरज आहे, असे श्री. शिंदे म्हणाले.

रुग्णसेवेच्या माध्यमातून डॉक्टरांचे कार्य देवदूतासमान असते, असे मत बांदा मराठा समाज माजी अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी बोलताना व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, बांदा मराठा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना मोफत आरोग्य तपासणी तसेच उपचारांची सुविधा उपलब्ध होणार आहे. डॉक्टर हे केवळ रुग्णांवर उपचार करणारे नसून अनेकांना नवजीवन देण्याचे काम करतात. त्यामुळेच डॉक्टरांना खऱ्या अर्थाने देवदूत म्हटले जाते. रुग्णांची सेवा करणे, त्यांच्या वेदना समजून घेऊन त्यांना योग्य उपचार उपलब्ध करून देणे हे डॉक्टरांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आणि कौतुकास्पद आहे. आजच्या आरोग्य शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून नेत्र तपासणीसह विविध आरोग्यविषयक तपासण्या करण्यात येणार आहे. बांदा मराठा समाजाने पुढाकार घेऊन आयोजित केलेले हे आरोग्य शिबीर निश्चितच पंचक्रोशीतील नागरिकांसाठी लाभदायक ठरणार आहे.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांचा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून करण्यात आला. या शिबिराचा १५० पेक्षा जास्त रुग्णांनी लाभ घेतला. सदर शिबिर यशस्वी होण्यासाठी माजी अध्यक्ष निलेश मोरजकर, उपाध्यक्ष विनोद सावळ, सचिव सिताराम गावडे, सहसचिव हेमंत मोर्ये-सावंत,खजिनदार महादेव सावंत-मोर्ये, कार्यकारीणी सदस्य भूषण सावंत, लवू रेडकर, मिलिंद सावंत, शामसुंदर धुरी, सदस्या सौ.लक्ष्मी सावंत, सौ.ममता सावंत,सौ.अवंती पंडीत, सौ.माधवी गाड, सौ. राखी कळंगुटकर,सौ. रिना मोरजकर यांनी परिश्रम घेतले. यावेळी मकरंद तोरसकर,कास सरपंच प्रविण पंडित,ज्ञानेश्वर सावंत, माजी उपाध्यक्ष बाबा गाड, माजी सचिव महादेव सावंत, संतोष सावंत, माजी सहसचिव राजेश सावंत,माजी खजिनदार राकेश परब, सागर सावंत,माजी सदस्य विक्रम कदम, उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव सिताराम गावडे यांनी तर सूत्रसंचालन सौ.रिना मोरजकर तर शेवटी आभार मा़धवी गाड हीने मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे