सावंतवाडी अपघातात दोघांचाही मृत्यू… जमलेल्या युवकांकडून मदत..
सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी
सावंतवाडीत काल रात्री झालेल्या भीषण दुचाकी अपघातात दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आयुषी देसाई हि उडून पडल्याने जागीच मृत्यू झाला होता तर युवक कार्तिक परब यांचा उपजिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दोघेही सावंतवाडीत राहतात…
दरम्यान ज्यावेळी अपघात घडला त्यावेळी कुठल्याही सामाजिक संस्थेने मदत केली नाही.. स्थानिक आणि युवकांनी मदत केली केली. युवती जागीच ठार झाल्याने तिच्या कडे कुणीही पाहिले नाही तर युवक गटारात उलटा पडला होता… तोंड मातीत घुसले होते… तो काही वेळाने दिसला त्याला उचलून रस्त्यावर आणण्यासाठी कोणीही पुढाकार घेतला नव्हता पण तो थोडा जीवंत असल्याचे लक्षात येताच एका मुस्लिम युवकास तिघांनी पुढाकार घेत रस्त्यावर आणले आणि सरळ केले असता तो उचकी घेत होता… मग युवकांनी पोलिस, रूग्णवाहीका,रिक्षा बोलवलीत…


