न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

२८ भारतीय असलेल्या आणखीन एका भारतीय जहाजांवर हल्ला

वृत्तसंस्था/

गेल्या तीन महिन्यांपासून मोठा तणाव इराण आणि अमेरिका यांच्यात आहे. सतत युद्ध सुरू आहे. या युद्धाचा परिणाम जगाला भोगावा लागत आहे. यादरम्यानच होर्मुज खाडीत झोप उडवणारी घटना नुकताच घडली. इराणच्या समुद्रहद्दीत 28 भारतीय नागरिक असलेल्या जहाजावर मोठा हल्ला करण्यात आला. एलपीजी गॅस टॅंकरवर हल्ला करण्यात आला. तेहरानमधील भारतीय दूतावासाने या हल्ल्याची पुष्टी केली. भारतीय दूतावासाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितले की, मोजम्बिकचा झेंडा असलेल्या एलपीजी गॅस टॅंकरवर हल्ला झाला. यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वजण सुरक्षित आहेत. होर्मुज खाडीत हा हल्ला झाला. मात्र, हा हल्ला नक्की कोणी केला याबाबत माहिती पुढे येऊ शकत नाहीये. हे जहाज फारस खाडीकडे पुढे सरकत होते, त्यावेळी हा हल्ला झाला.

या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा होर्मुज खाडीतील सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. जगातील 20 टक्के गॅस याच रस्त्याने नेला जातो. मात्र, हाच मुख्य मार्ग आता सुरक्षित राहिला नाही. अमेरिकाआणि इराण यांच्यात तणाव आहे. मोठ्या प्रमाणात होर्मुज खाडीतून जाणाऱ्या जहाजांना टार्गेट करून हल्ले केले जात आहेत. भारतीय जहाजालाही टार्गेट करून मोठे हल्ले होर्मुज खाडीत झाली.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे