न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठुरायाची सपत्नीक पुजा

सोलापूर/ वृत्तसंस्था

देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची सपत्नीक शासकीय महापूजा केली. महाराष्ट्रावर विठूमाऊलीची कृपादृष्टी सदैव राहो, राज्यात सुख-समृद्धी नांदो, शेतकरी सुखी-समृद्ध होवो आणि जनतेच्या जीवनात आनंद आणि समाधान लाभो, अशी प्रार्थना त्यांनी विठूमाऊलीच्या चरणी केली.

पंतप्रधाान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या तरुणाईसाठी सुरु केलेल्या विकास आणि नव्या संधींच्या प्रवासाला अधिक बळ मिळावे, प्रत्येक युवक-युवतीच्या आशा-आकांक्षा पूर्ण व्हाव्यात आणि विकसित भारताच्या निर्मितीचा संकल्प अधिक वेगाने साकार व्हावा, यासाठीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठल-रखुमाईच्या चरणी प्रार्थना केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरपूर येथे धाराशिव जिल्ह्यातील गौरगाव येथील मानाचे वारकरी  दाम्पत्य श्री. बाळासाहेब माने आणि श्रीमती प्रभावती माने यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार 2026’ प्रदान करण्यात आले.

“यंदा वारीने नवा उच्चांक गाठला असून 25 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरापर्यंत भाविकांची रांग लागली. मात्र सर्व भाविकांची अत्यंत चांगल्या प्रकारे व्यवस्था करण्यात आली आहे. विठ्ठल नामाचा गजर करत भाविक दर्शन घेत आहेत. जगाच्या पाठीवर असा आनंदाचा सोहळा दुसरा कुठेही नाही, जिथे कोणत्याही निमंत्रणाशिवाय लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पायी निघतात.” अशा भावना यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.

पंढरपूर येथे भगवान श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येतात. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता अधिक प्रशस्त परिसर आणि आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे काळाची गरज आहे. त्यादृष्टीने यावर्षीच पंढरपूर मंदिर कॉरिडॉरच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असून, ते पूर्ण झाल्यानंतर दर्शन व्यवस्था अधिक सुलभ, सुव्यवस्थित आणि सुरळीत होईल.” अशी आशाही फडणवीसांनी व्यक्त केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे