न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

बंडखोर खासदारांचं मतदारसंघात फिरणं मुश्कील? ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप; रस्त्यावर…

मुंबई/ वृत्तसंस्था

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील 9 पैकी 6 खासदारांनी बंड केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या बंडखोर खासदारांनी आपला वेगळा गट स्थापन केला आहे. लवकरच हे खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षात विलीन होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर नाराज होऊन या खासदारांनी तसा निर्णय घेतल्याचा दावा केला जातोय. दरम्यान, खासदारांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात मात्र मोठी खळबळ उडाली आहे. ठाकरे यांच्या पक्षात स्थानिक पातळीवर संताप व्यक्त केला जात आहे. ठाकरेंच्या नेत्यांंनी अनेक ठिकाणी रोष व्यक्त केलाय. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याविरोधात तर अनेक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

वाकचौरे यांच्या भूमिकेमुळे शिर्डीतील ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष दिसून येतोय. 2014 साली वाकचौरे यांनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केल्यानंतर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले होते. त्यांना पुन्हा पक्षात घेऊन नका अशी विनंती आम्ही उद्धव ठाकरेंना केली होती, मात्र साईबाबांची शपथ घेतल्याने त्यांच्यावर विश्वास दाखवत ठाकरेंनी वाकचौरेंना उमेदवारी दिली. आता वाकचौरे यांनी ठाकरेंशी पुन्हा गद्दारी केली असून, त्यांना येणाऱ्या काळात धडा शिकवू अशा संतप्त भावना शिवसैनिकांनी व्यक्त केल्या आहेत.

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात संगमनेरमध्ये आक्रमक आंदोलन करण्यात आलं. वाकचौरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. ‘गद्दारी सहन केली जाणार नाही’, ‘ठाकरे विचारांशी विश्वासघात करणाऱ्यांना माफी नाही’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. कार्यकर्त्यांनी वाकचौरे यांच्यावर पुन्हा एकदा गद्दारी केल्याचा आरोप करत त्यांना मतदारसंघात फिरू देणार नाही, असा थेट इशारा दिला आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे