साता-या दीड वर्षाच्या मुलाची बिबट्याकडून शिकार
सातारा/ प्राची जोगळेकर
सातारा जिल्ह्यात वन्यप्राण्यांचे जनावरांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले असतानाच काल (४ऑक्टोबर) सातारा तालुक्यातील न्हाळेवाडीत बिबट्याने घरातून दीड वर्षाच्या मुलाला ओढत नेऊन त्याचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. संतप्त ग्रामस्थांनी वनविभागावर आक्रमक होऊन मृतदेहच कार्यालयात नेला.


