न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडी पोलिस ठाण्यातील गणरायाला भक्तिभावाने निरोप 

 

सिंधुदुर्ग  राजू तावडे

    सावंतवाडी पोलिस ठाण्यातील १९ दिवसांच्या गणरायाला शुक्रवारी भक्तिभावाने निरोप देण्यात आला. गणेशोत्सवात बंदोबस्तात तैनात असणारा खाकीतील माणूस या निमित्ताने विसर्जन मिरवणुकीत दंग झालेला दिसून आला.

गेले १९ दिवस पोलीस ठाण्यात गणरायाची सेवा पोलिसांसह त्यांच्या कुटुंबीयांनी केली. शुक्रवारी रात्री मोठ्या भक्तिभावाने गणरायाला निरोप देण्यात आला. रूचिका म्युझिकल माडखोल यांचा बेंजो पथक व स्थानिकांसह पोलीसांचा सहभाग असणार ढोलपथक मिरवणूकीच खास आकर्षण ठरले. मिरवणुकीत बेंजोच्या तालावर पोलिस देहभान विसरून नाचले. लाडक्या गणरायाला पुढच्या वर्षी लवकर येण्याचे साकडे घालत भक्तीभावाने निरोप देण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे