बांदा लकरकोट श्री दत्त मंदिर येथे श्री गुरुपौर्णिमा उत्सव
सिंधुदुर्ग / राजू तावडे
बांदा लकरकोट येथील श्री दत्त मंदिरात बुधवार दि. २९ जुलै रोजी श्री गुरु पौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त मंदिरात पहाटेपासून संपूर्ण दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहे.
पहाटे पाच वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजा, सकाळी आठ वाजता श्री दत्त महाराजांची महापूजा व सालाबाद प्रमाणे अभिषेक,सकाळी 9 वाजता लघुरुद्र,दुपारी एक वाजता महानैवेद्य महाआरती व सामूहिक गाऱ्हाणे होईल. त्यानंतर
दुपारी दीड वाजता महाप्रसादास आरंभ होईल.
सायंकाळी पाच वाजता श्री बांदेश्वर महिला भजन मंडळाचे भजन, 8 वाजता श्री आपटेश्वर भजन मंडळ सटमठ यांचे भजन कार्यक्रम होईल .रात्री ९.३० वाजता शेजारती होईल.
सर्व भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळ श्री दत्तमंदिर, लकरकोट बांदा च्या वतीने अध्यक्ष सुशांत पांगम यांनी केले आहे.


