दादा गेले हे मानायला मन तयार नाही… बबन साळगावकर स्व.अजित पवार यांना गुरुकुल समूहातर्फे श्रद्धांजली
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
प्रशासनावर पकड असलेला नेता म्हणून अजितदादा पवार यांची ओळख आहे. सावंतवाडीच्या विकास कामासाठी मी नगराध्यक्ष असताना दादांनी विकासनिधी दिलेला आहे. सावंतवाडी शहराच्या विकासात दादांचे मोठे योगदान आहे, अशा महान नेत्याला आम्ही हरपले. दादा गेले हे मानायला अद्यापही मन तयार नाही अशी प्रतिक्रिया सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज व्यक्त केली.
बुधवार सायंकाळी पाटील कॉम्प्लेक्स, शिवाजी चौक सावंतवाडी येथे चाणक्य गुरुकुल समूह व राजा शिव मित्र मंडळाच्या वतीने स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बबन साळगावकर बोलत होते. याप्रसंगी अजित पवार यांच्या प्रतिमेला सर्वांनी पुष्पहार व पुष्प अर्पण केली.
यावेळी राजा शिवाजी चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर,नगरसेवक विलास जाधव, माजी नगरसेवक मनोज नाईक, ज्येष्ठ पत्रकार राजू तावडे, यशवंत देसाई, नारायण सावंत, बावतीस फर्नांडिस, अशोक पेडणेकर, डुमिंग आल्मेडा, बंड्या तोरस्कर, प्रदीप नाईक, मनोज घाटकर, उमेश खटावकर, दिलीप पवार, गोट्या फडतरे, ॲड.मेहमूद रखानजी व रवी जाधव उपस्थित होते.


