न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

काय म्हणायचे? या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत! प्रधान पायउतार होताच अभिजित दिपकेंची पहिली प्रतिक्रिया, CJP चा मोठा विजय

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर केंद्रीय शिक्षण मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी कॉक्रोच जनता पक्षाने केलेल्या जंतरमंतर येथील आंदोलनाला मोठं यश आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे सर्वेसर्वा अभिजीत दिपके यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. प्रधानांच्या राजीनाम्यानंतर जंतरमंतर येथे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

“We have done it! काय म्हणायचे.. की या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत.” असं म्हणत अभिजीत दिपके यांनी मूठ आवळत जंतरमंतर येथील आंदोलकांसमोर विजयी भावना व्यक्त केली

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. यावरुन हे सिद्ध होते की, जर तुम्ही घाबरला नाहीत आणि या सरकारसमोर झुकला नाहीत, तर तुम्ही भल्याभल्यांचा राजीनामा घेऊ शकता. लोकशाही आहे, घाबरू नका. बोलायची भीती वाटली तर कसली लोकशाही? आवाज उठवला तरच हे शिस्तीत राहतील” असं अभिजित दिपके यांनी सांगितलं.

धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी २ वाजून १८ मिनिटांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर राजीनाम्याचे पत्र पोस्ट करत मोठी घोषणा केली. ‘पहिल्या दिवसापासूनच मी नीट पेपरफुटी प्रकरणाची जबाबदारी स्वीकारली आणि या परिस्थितीतून कधीही माघार घेतली नाही. ‘परीक्षा माफियां’मुळे कोणत्याही गुणवान विद्यार्थ्याचे भवितव्य उद्ध्वस्त होऊ द्यायचे नाही आणि कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ द्यायचा नाही, असा माझा ठाम निश्चय होता.’ असे धर्मेंद्र प्रधान यांनी लिहिले आहे

नरेंद्र मोदी सरकारच्या काळात गेल्या १२ वर्षांच्या काळात, आरोप झाले म्हणून फक्त एम जे अकबर या एकाच मंत्र्यांचा राजीनामा आतापर्यंत घेतला गेला होता. आता धर्मेंद्र प्रधान हे दुसरे उदाहरण ठरले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे