सावंतवाडीतील भटवाडीत ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात एकादशी साजरी
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
सावंतवाडी भटवाडी येथील पुरातन विठ्ठल मंदिरात महा एकादशी निमित्त उत्सव साजरा होत आहे. हे मंदिर अंदाजे साडेतीनशे वर्षापूर्वी सावंतवाडी संस्थांचे अधिपती, पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांनी बांधले. मंदिरा शेजारीच चंद्रभागा तलाव ही आहे. मंदिर स्थापनेपासून पुजारी म्हणून अळवणी कुटुंबीय येथे आले. आता या देवळाचा ट्रस्ट निर्माण झाला आहे. मात्र विठोबा रखुमाईची पूजा अजून अळवणी कुटुंबीय करतात.


