न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त भोसले स्कूलच्या चिमुकल्यांची सावंतवाडीत जनजागृती रॅली 

 

सिंधुदूर्ग / राजू तावडे 

  महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने शुक्रवारी सावंतवाडी शहरात विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली. विविध सामाजिक विषयांवरील घोषणांनी शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेत विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या विचारांना कृतीची जोड दिली.

‘झाडे लावा, झाडे जगवा’, ‘माणूसकी जपा’, ‘स्वच्छता राखा’ अशा विविध घोषणांनी रॅलीदरम्यान परिसर दुमदुमून गेला. पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, माणुसकी आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देत विद्यार्थ्यांनी नागरिकांमध्ये जनजागृती केली. नारायण मंदिर येथून रॅलीला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख बाजारपेठेतून मार्गक्रमण करत रॅली गांधी चौकात पोहोचली. याठिकाणी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यातून महात्मा गांधीजींचा सत्य, अहिंसा आणि स्वच्छतेचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला. तसेच आजच्या डिजिटल युगात मोबाईलचा वापर जबाबदारीने आणि मर्यादित स्वरूपात करण्याचा संदेशही पथनाट्यातून देण्यात आला.

चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याला आणि जनजागृतीपर घोषणांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महापुरुषांच्या विचारांची केवळ जयंतीपुरती आठवण न ठेवता ते दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या उपक्रमात शाळेच्या उपमुख्याध्यापिका अवंतिका नाईक, शिक्षिका उमा झारापकर, रसिका कंग्राळकर, महिमा चारी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. नारायण मंदिर येथून सुरू झालेली ही रॅली शहरातील बाजारपेठेतून मार्गक्रमण करत पुन्हा त्याच ठिकाणी आल्यानंतर तिची सांगता झाली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे