न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

संकटसमयी भाजपा पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी : उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

    भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आवाहनानंतर सावंतवाडी परिसरातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा देण्याचे काम सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर व भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. सावंतवाडी शहराच्या सीमेवर असलेल्या झिरंगवाडी, गरड आणि माजगावसह आसपासच्या विविध गावांतील बऱ्याच शेतकऱ्यांची भातशेती पाण्याअभावी पूर्णपणे कोरडी पडली असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष शेतावर जाऊन जळालेल्या भातशेतीची व बागायतींची बारकाईने पाहणी केली. पावसाच्या ओढीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. या संकटसमयी भारतीय जनता पक्ष पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून, झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून त्यांना योग्य भरपाई मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असा विश्वास उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी बाधित शेतकऱ्यांना दिला.

या पाहणी दौऱ्यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेचे नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, विजय साटेलकर यांच्यासह भाजपचे प्रमुख कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे