न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

तिरोडा गावच्या समस्यांबाबत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी घेतली जि.प. अध्यक्ष कामात यांची भेट

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

  सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे अध्यक्ष प्रमोद कामत यांची भेट नुकतीच माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सरपंच प्रियांका सावंत, उपसरपंच संदेश केरकर, पुरुषोत्तम शेणई उपस्थित होते. सर्वांनी भेट घेऊन अध्यक्षांचे अभिनंदन केले. आजची बैठक जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. प्रमोद कामत यांनी आयोजित केली होती. या बैठकीमध्ये तिरोडा माऊली मंदिर तलाव संवर्धन संदर्भात, तिलारी पाणी व्यवस्थापन तसेच जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरठा, खाशेवाडी व रेडी यांना जोडणारा साकव यासंदर्भात होती. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पुंड, चीफ एक्झिक्यूटिव्ह सुदेश राणे, पाणीपुरवठाचे राजेंद्र सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परब उपस्थित होते. त्या महत्त्वाच्या प्रश्ना संदर्भात चर्चा करून जिल्हा परिषद अध्यक्ष श्री प्रमोद कामत यांनी तिरोडा शिरोडा पाण्याचा प्रश्न, रेडी नानोस आणि तिरोडा यांना जोडणारा प्रश्न आणि तिरोडा गावातील जलजीवन मिशन योजना याबाबतीत त्वरित कार्यवाही करावी व काय कार्यवाही झाली याबाबतची माहिती अध्यक्षांना द्यावी असे ठरविण्यात आले. या बैठकी झालेल्या समाधानकारक चर्चेबाबत सर्व उपस्थितांनी अध्यक्ष प्रमोद कामत यांचे आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे