न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

गोव्यात आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटचा पर्दाफाश..‌

 

पणजी/

गोव्यातील सायबर गुन्हे शाखेने एका मोठ्या आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटचा पर्दाफाश केला. करमळी येथील एका भाड्याच्या बंगल्यात सुरु असलेल्या बेकायदेशीर कॉल सेंटरवर मध्यरात्री छापेमारी केली. या कारवाईत पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाईल फोन आणि इतर डिजिटल उपकरणे असा सुमारे 23 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हे आरोपी गोव्याच्या शांत वातावरणाचा फायदा घेत परदेशातील नागरिकांना लुटण्याचे काम करत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले आरोपी ‘पे-डे’ (Payday) नावाच्या एका बनावट कर्ज कंपनीचे एजंट असल्याचे भासवून अमेरिकेतील (USA) नागरिकांना लक्ष्य करत होते. तातडीने कर्ज देण्याचे खोटे आमिष दाखवून हे आरोपी तिथल्या लोकांना आपल्या जाळ्यात ओढत असत. एकदा का समोरची व्यक्ती कर्जासाठी तयार झाली, की प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली किंवा इतर तांत्रिक कारणास्तव त्यांच्याकडून मोठ्या रक्कमेची मागणी केली जात असे. ही रक्कम थेट बँक खात्यात न घेता ‘गिफ्ट कार्ड्स’च्या स्वरुपात घेतली जात होती, जेणेकरुन पैशांचा मागोवा घेणे कठीण होईल. अशा प्रकारे या टोळीने अनेक अमेरिकन नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे