अकोला ठरले जगातील दुसरे “हॉट” शहर… १७ एप्रिलपर्यंत सावधगिरी बाळगावी.. महाराष्ट्र शासन
नागपूर/
नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागातर्फे 13 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान अकोला जिल्ह्यात तसेच विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये तसेच संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. त्यानुसार आवश्यक दक्षता घेण्याबाबत आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
राज्यातील लोकांनी दुपारी 12 ते 4 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे, बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत, उन्हात वाहने शक्यतो चालवू नये, ज्वलनशील पदार्थापासून शक्यतो दूर राहावे, लहान मुले आणि पाळीव प्राण्यांना गेट बंद असलेल्या वाहनात तसेच पार्क केलेल्या वाहनात ठेवू नयेत. तहान लागलेली नसली तरी जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे, अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा, पशुधनास तसेच पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी देण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे”


