न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

पत्रकार हरिश्चंद्र पवार यांना मातृशोक… सौ. चंद्रावती पवार यांचे निधन

 

सिंधुदुर्ग / प्रतिनिधी

सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा तरचावाडा येथील रहिवासी व माजी सैनिक चंद्रकांत पवार यांच्या पत्नी, तसेच ज्येष्ठ पत्रकार हरिश्चंद्र पवार यांच्या मातोश्री सौ. चंद्रावती चंद्रकांत पवार (वय ७९ वर्षे) यांचे मंगळवारी पहाटे सुमारे ६.३५ वाजता दुःखद निधन झाले.
त्यांच्या निधनाने पवार कुटुंबावर शोककळा पसरली आहे. प्रेमळ, साधी आणि कुटुंबवत्सल अशी त्यांची ओळख होती. आयुष्यभर त्यांनी आपल्या कुटुंबासाठी निःस्वार्थपणे झटत प्रत्येक जबाबदारी समर्थपणे पार पाडली. घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रेमाने जोडून ठेवणारा तो धागाच जणू आज तुटला आहे. त्यांच्या शांत, संयमी स्वभावामुळे त्या सर्वांच्या मनात कायमच आदराचे स्थान मिळवून होत्या.
त्यांच्या पश्चात मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनानंतर गावकऱ्यांसह विविध स्तरांतून शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे