न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

राजापूरात शिक्षक दांपत्याला सहा लाखांचा फटका

रत्नागिरी/ मेघेश मोंडकर

राजापूर तालुक्यातील पाचल-विद्यानगर येथे शिक्षकाच्या बंद घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा सुमारे ६ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पाचल परिसरात खळबळ उडाली आहे.

पाचल परिसरात महामार्गावर खरवते येथे पोलीस पाटलांच्या घरी चोरीची घटना ताजी असतानाच पूर्व भागातील पाचल-विद्यानगर येथे ही घरफोडी झाली. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुळसवडे हायस्कूलमध्ये शिक्षक असलेले मुसामल्ली गुलाब पिरजादे यांच्या पाचल-विद्यानगर येथील बंद घराला अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य केले. चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा हत्याराच्या साहाय्याने तोडून घरात प्रवेश केला.

घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी कपाटे आणि तिजोरी उघडून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोकड लंपास केली. चोरी झालेल्या ऐवजाची एकूण किंमत तब्बल ६ लाख ५० हजार रुपयांच्या आसपास असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे