न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सिद्धेश परब यांच्यावरील कारवाईचा अखिल भारतीय मराठा महासंघाकडून निषेध

सिंधुदुर्ग /मनोज घाटकर 

 

वेगुर्ला पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा मराठा कार्यकर्ते सिद्धेश परब यांच्यावर अमली पदार्थ सापडल्याच्या आरोपावरून करण्यात आलेल्या कारवाईचा अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने निषेध करण्यात आला आहे.
महासंघाचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास शं. सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही भूमिका मांडली. सिद्धेश परब हे गेल्या दहा वर्षांपासून मराठा चळवळीशी जोडलेले असून सिंधुदुर्गातील प्रत्येक मराठा बांधव त्यांना ओळखतो. त्यांच्या सामाजिक कार्याची तळमळ मोठी असल्याचे महासंघाने म्हटले आहे.

सामाजिक जाणिवेतून त्यांनी मायनॉरिटीच्या विरोधात लढा सुरू केला होता. त्यानंतर त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न हितशत्रूंनी केल्याचा आरोपही महासंघाने केला आहे. सध्याची प्रशासकीय परिस्थिती पाहता प्रशासन हे धनाढ्य लोकांचे बटीक झाल्याची टीका प्रसिद्धीपत्रकातून करण्यात आली आहे.
“आजची कारवाई सूडभावनेतून करण्यात आली असून, मायनॉरिटी हस्तकांच्या इशाऱ्यावर अशा स्वरूपाची कारवाई करण्यात आली आहे,” असा आरोप महासंघाने केला आहे. या कारवाईचा अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्ग निषेध करत असून, अशा प्रसंगी सिद्धेश परब व त्यांच्या कुटुंबीयांच्या समवेत समाजबांधवांनी राहावे, असे आवाहनही अॅड. सुहास शं. सावंत, जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्ग यांच्याकडून करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे