न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

हाआरती संग्रह आमच्यासाठी एक मंगल कलश: महादेव नाडकर्णी 

 

सिंधुदुर्ग  / राजू तावडे 

   श्री देव बनखनकर सांस्कृतिक कला, क्रीडा मंडळ यांनी प्रसिद्ध केलेला हा पारंपारिक संगीत आरती संग्रह केवळ आरती संग्रह नसून तो आमच्यासाठी एक मंगल कलश आहे आणि हा मंगल कलश प्रत्येकाने आपल्या देव्हाऱ्यात ठेवावा असे प्रतिपादन महादेव नाडकर्णी यांनी केले.

बांदा काळसेवाडी सुतारवाडीच्या श्री देव बनखनकर सांस्कृतिक कला, क्रीडा मंडळाने आपल्या पारंपारिक संगीत आरती संग्रहाचे प्रकाशन शुक्रवारी नट्ट वाचनालय बांदा येथे केले यावेळी महादेव नाडकर्णी बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाच्या प्रतिमेला पुष्पहार वाहून झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी श्री. संदेश पावसकर, बांदा ग्रामपंचायत सदस्य श्री. साई काणेकर, माजी ग्रामसेवक श्री. रामचंद्र उर्फ बाबी कोचरेकर, श्री. महादेव नाडकर्णी, सौ. गौरी नाडकर्णी, श्री. जगन्नाथ सातोसकर, मंडळाचे अध्यक्ष परेश कोचरेकर, महिला उपाध्यक्ष सौ. सावली कामत उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना श्री. महादेव नाडकर्णी म्हणाले, काळसेवाडा सुतारवाडी येथील दोन शतकाची पुस्तकात न म्हणता संगीत आरती म्हणण्याची परंपरा आताच्या पिढीनेही चालू ठेवली आहे. पूर्व परंपरागत चालू असलेल्या या आरती आज संग्रहीत करून छापील स्वरूपात आज त्याचा आरतीसंग्रह प्रकाशित होत आहे. हे खरोखर कौतुकास्पद असून यासाठी मंडळाला मी शुभेच्छा देत आहे.

बांदा ग्रामपंचायत सदस्य श्री. साई काणेकर यावेळी म्हणाले, हा आरती संग्रह अतिशय अभ्यासपूर्ण स्वरूपाचा असून यामध्ये असलेल्या आरती खूप जुन्या आहेत. आमच्याही घरामध्ये यातील दोन-तीन आरती आम्ही कायमस्वरूपी देवापुढे सादर करतो. मंडळांने राबविलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून मी त्याचे स्वागत करत आहे.

तर प्रमुख पाहुणे श्री. संदेश पावसकर यावेळी म्हणाले, श्री. महादेव नाडकर्णी यांच्यामुळे मला या चांगल्या उपक्रमात सहभागी होता आले. या वाडीतील लोकांनी केलेले हे फार महत्वाचे कार्य असून तुमच्यासाठी माझे सहकार्य कायमस्वरूपी राहील.

याप्रसंगी श्री. जगन्नाथ सातोसकर, ज्येष्ठ पत्रकार राजू तावडे, श्री. बाबी कोचरेकर यांनी मार्गदर्शन केले. बाबी कोचरेकर यांनी मंडळासाठी दोन हजार रुपयांची देणगी जाहीर केली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सूहास बांदेकर, सचिव अनुप बांदेकर, खजिनदार अनोज बांदेकर, सुनील बांदेकर, पत्रकार युवराज परब, सुधीर बांदेकर, प्रथमेश मेस्त्री, अजित बांदेकर, महेश बांदेकर, संदीप बांदेकर, राजेंद्र बांदेकर, गुरुनाथ मेस्त्री, संतोष सातोसक, मकरंद गोरे, प्रशांत गायतोंडे, दिनू देसाई, विलास मोर्ये, सौ. अर्चना सावंत, सौ. शितल बांदेकर, सौ. अनिता बांदेकर, सौ. माया कोचरेकर, सौ. प्राची कोचरेकर, सौ. सरिता तर्पे, श्री. बाळा कोचरेकर, श्री. राजू तावडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे