न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

ओसरगावात रस्त्यासाठी खड्ड्यात बसून आंदोलन…

सिंधुदुर्ग / राजू तावडे

कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथील नालंग घर ते तोरस्कर घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. गेल्या सुमारे ४० वर्षांपासून या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाची मागणी होत असतानाही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आंदोलन छेडले.

 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्याची तातडीने तात्पुरती डागडुजी करण्यात यावी, तसेच पुढील काळात कायमस्वरूपी खडीकरण व डांबरीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत लेखी निवेदन अथवा ठोस आश्वासन देण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली.

जोपर्यंत गणेशोत्सवासाठी रस्त्याची तात्पुरती डागडुजी होत नाही आणि पुढील खडीकरण-डांबरीकरणाबाबत लेखी आश्वासन दिले जात नाही, तोपर्यंत आंदोलनातून उठणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली.

दरम्यान, स्थानिक तसेच तालुका प्रशासनाने घटनास्थळी येऊन ग्रामस्थांच्या मागण्या ऐकून घ्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासन घटनास्थळी येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. वेळ पडल्यास गणपतीची पूजाही याच ठिकाणी करण्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे