न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मराठी भाषेचं शुध्दीकरण करण्याची मधु मंगेश कर्णिक यांची रत्नागिरीत कृतज्ञता सोहळ्यात मागणी

रत्नागिरी/ संतोष मुळीक 

आजचा सोहळा… म्हाता-या बैलाक घुंघुरवाळे… असा असून या सोहळ्याच्या निमित्ताने कोमसाप एकत्रित आला.. . कोमसाप महत्त्व विश्वास पाटीलांना कळलं म्हणून दारासिंग सारख्या माणसाकडून त्यांनी दहा लाख मिळवून दिले..एवढं कोमसाप मोठं आहे… आज शंभरी जवळ आलेलो असताना माझा करण्यात येणारा सत्कार हा माझा नसून मराठी साहित्याचा आहे..कोमसापचा असल्अयाचे  भावोद्गार सत्कारमुर्ती मधु मंगेश कर्णिक यांनी व्यक्त करीत मराठी भाषेचं शुद्धीकरण करण्याचे आवाहन त्यांनी शासनाकडे केली.

 

कोंकणातील साहित्य चळवळीचे अभिमान स्थान तसेच समस्त मराठी साहित्य परंपरेतील अद्वितीय मानबिंदू असलेल्या जेष्ठ साहित्यिक मधु भाई कर्णिक यांचा महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग, रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय आणि कोंकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने  ‘साहित्य ,समाज कृतज्ञता सोहळा स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात पार पडला.

यावेळी व्यासपीठावर मंत्री उदय सामंत, लेखक, दिग्दर्शक विश्वास पाटील , नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे.  नमिता कीर, अशोक बागवे, वासंती वर्तक, अरूण म्हात्रे, प्रदीप ढवळे. , अभिजीत हेगशेट्ये, जयू भाटकर आदी उपस्थित होते.तसेच हा कार्यक्रमात सहभाग दर्शविण्यासाठी कोंकणातील साहित्य रसिक उपस्थित होते.

सत्कार सोहळ्यात मधु भाई कर्णिकांनी मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्याकडे  मराठी भाषा शुध्दीकरणाची मागणी केली.   सध्याची शालेय पुस्तकातील भाषा अशुद्ध असल्याची खंत व्यक्त केली. मालवणी, कोकणी, कोल्हापूरी, विदर्भिय, मराठवाडी, अहिराणी अशा अनेका भाषांचा गर्व असलाच पाहिजे पण आपण महाराष्ट्रातील आहोत हे लक्षात ठेवा… आमच्यात इतरांना घुसवू नका… आम्हाला परशुराम मान्य आहे .पण आमची अस्मिता पण तेवढीच भक्कम असा उपरोधिक टोला पुणे साहित्य मंडळाला लगावत  कृतज्ञता पुरस्कारा बाबत आभार मानले.

यावेळी रत्नागिरीतील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कोंकणातील ९६साहित्यिकांनी लिहिलेला विशेषंकाचे प्रकाशन करण्यात आले .प्रस्ताविक प्रा.प्रदीप ढवळ यांनी केले.

5/5 - (1 vote)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे