न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठाने इन्सुली घाटीतील रस्त्यावर पडलेली झाडे हटविली

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

 आज सकाळी 8 च्या सुमारास इन्सुली घाटी मध्ये झाडाच्या फांद्या व वेली रस्त्यावर तुटून पडल्या होत्या. काही वेली रस्त्याच्या मधोमध लटकत होत्या. त्यामुळे त्या रस्त्यावर रहदारी मोठ्या प्रमाणात खोलंबली होती. याची माहिती सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना मिळताच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सदस्य सुजय सावंत व लक्ष्मण कदम काही वेळातच घटनास्थळी पोचले. झाडाच्या तुटलेल्या फांद्या व रस्त्याच्या मधोमध लटकत असलेल्या वेली डंपरवर चडून तोडल्या व तत्काळ रहदारीस मार्ग मोकळा करून दिला. आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रशासनाचे काम हलके करणे तसचे नेहमीच कुठच्या ना कुठच्या संकटात निस्वार्थपणे नागरिकांना सहकार्य करणारी ही संस्था नेहमीच चर्चेत असते.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्काळ मदत करून नागरिकांना मोठा दिलासा देत आहे. त्यांच्या या निस्वार्थ सेवाभावी कार्याचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे