न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

श्रीगजानन महाराज प्रकट दिनानिमित्त शेगावात चार लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल…

बुलढाणा/ सचिन व्यवहारे 

संत श्री गजानन महाराज आज १४८ वा प्रगट दिन उत्सव सोहळा शेगावातील संत गजानन महाराज समाधी मंदिरात साजरा करण्यात येत आहे.. यानिमित्त राज्यासह परराज्यातून ७०० च्या वर दिंड्या दाखल झाल्या आहे .. आज दिवसभर लाखो भाविक शेगावात येणार असून संतनगरीत भाविकांची मांदियाळी पहायला मिळणार आहे. सध्या चार लाखांच्या आसपास भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत.

मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले करण्यात आले आहे. येणाऱ्या भाविकांना राहण्यासाठी तसेच भोजनाची योग्य सोय करण्यात आली असून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.सध्या शेगाव नगरी गण गण गणात बोते च्या मंत्रघोषात न्हाऊन निघाली आहे.वाहनतळावरून मंदिरात आणण्यासाठी संस्थानच्या गाड्या फिरत आहेत . त्यामुळे सध्यातरी वाहतूक कोंडी झाली नाही आहे

.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे