न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

शिक्षण प्रसारक मंडळ, तळवडेच्या अध्यक्षपदी श्रीकृष्ण पेडणेकर

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. काकासाहेब पेडणेकर व माजी अध्यक्ष कै. अण्णासाहेब बुगडे यांच्या समृद्ध विचारांचा वारसा घेऊन मार्गक्रमण करणाऱ्या तसेच पंचक्रोशीतील शैक्षणिक विकासाला चालना देणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ, तळवडेच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. संस्थेच्या आगामी कार्यकाळासाठी विविध पदांवर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या शैक्षणिक कार्याला अधिक व्यापक दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
नवीन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी श्री. श्रीकृष्ण शंकर पेडणेकर, उपाध्यक्षपदी डॉ. भालचंद्र कांडरकर, सचिवपदी श्री. न्हानू उर्फ दादा विष्णू पेडणेकर, सहसचिवपदी श्री. भूषण लवू पेडणेकर, खजिनदारपदी श्री. सुरेश जगन्नाथ गावडे, तर अंतर्गत हिशोब तपासणीसपदी श्री. संतोष विठ्ठल सावंत यांची निवड करण्यात आली आहे.
कार्यकारिणी सदस्य म्हणून श्री. विजय कृष्णाजी बुगडे, श्री. उमाकांत काशिनाथ भगत, श्री. विजय बापूजी फेंद्रे, श्री. बाबुराव दत्ताराम गोडकर, श्री. देवेश शिवराम कावळे आणि श्री. शंकर संभाजी साळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. स्वीकृत सदस्य म्हणून डॉ. भरत मधुकर बुगडे, श्री. वसंत रघुनाथ कांडरकर आणि श्री. हरिश्चंद्र गंगाराम काजरेकर यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या सल्लागारपदी प्रा. दिलीप दत्ताराम गोडकर, श्री. सच्चिदानंद मधुकर बुगडे, श्री. शशिकांत मधुकर रेडकर आणि श्री. विठोबा मोहन पेडणेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवनिर्वाचित कार्यकारणीचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, नवीन पदाधिकाऱ्यांच्या अनुभवाचा व मार्गदर्शनाचा संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीस निश्चितच लाभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. संस्थेच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या शाळा व महाविद्यालयांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन कार्यकारणी प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे