आज दिवे घाटातील माऊलींचा थाट अनुभवायला मिळणार… पाच दिवस पुण्यात वाहतूकीत बदल
पुणे/ प्रतिनिधी
पालखी सोहळ्यानिमित्त पुणे शहरातील वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत. आज शनिवारी दोन्ही पालखींचे पुण्यातून प्रस्थान होणार आहे, त्या अनुषंगाने वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आलेत. १०(काल रात्री पासून) ते १५ जुलैदरम्यान पर्याची मार्गांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आले आहे.आज दुपारपर्यंत पालखी सासवडला जाताना वाटेत दिवे घाटातील थाट अनुभवायला मिळणार आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२६ निमित्त राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ (पुणे–पंढरपूर/पुणे–बारामती मार्ग) वरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतुकीत तात्पुरते बदल करण्याची अधिसूचना जारी केली आहे.”
जेजुरी पोलीस स्टेशन,पुणे ग्रामीण- बेलसर फाटाः-
अ) १० जुलै रोजी रात्री २०ते १३जुलै दरम्यान सायंकाळी १७ वाजता या वेळेत बारामती, फलटण, सातारा बाजुकडून येणारी पुणे बाजुकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करुन बेलसर फाटा- वाघापुर चौक – उरुळी कांचन मार्गे पुणे बाजुकडे वळवावी.
(ब) १३ जुलै २०२६ रोजी सायंकाळी १७वाजता ते १४ रोजीचे रात्री २२ वा. रोजीपर्यंत जेजुरी, सातारा, फलटण, लोणंद, बारामतीकडे जाणारी सर्व वाहतुक ही बेलसर-नाझरे कप-काळाओढा-मोरगाव-निरा-लोणंद-साताराकडे वळवावी”
मोरगाव चौक जेजुरी
अ)१० जुलै रोजी रात्री २० वा. ते १२ जुलै रोजीचे रात्री २२ वा. रोजी पर्यंत निरामार्गे पुणेकडे जाणारी पालखीची वाहतुक व्यतिरिक्त इतर सर्व वाहने जेजुरी-मोरगाव -सुपा-कडेगाव चौफुला मार्ग पुणे बाजुकडे वळवायी.
(ब)१४ जुलै रोजी दुपारी १३ वा. ते १५ जुलै रोजीचे रात्री २२ वा. रोजी पर्यंत पुणे सासवड मार्गे लोणंद सातारा फलटणकडे जाणारी पालखीची वाहतुक व्यतिरिक्त इतर सर्व वाहने जेजुरी-मोरगाव-लोणी भापकर फाटा कोऱ्हाळे मार्गे फलटण बाजुकडे वळवावी.
भोरवाडी फाटा जेजुरी
१४ जुलै रोजी दुपारी १३ वा. ते १५ जुलै रोजीचे रात्री २२ वा. रोजी पर्यंत पुणे सासवड मार्गे लोणंद सातारा फलटण कडे जाणारी पालखीची वाहतुक व्यतिरिक्त इतर सर्व वाहने कोळविहीरे-मोरगाव रोड-मोरगाव-लोणी भापकर फाटा कोऱ्हाळे मार्गे फलटण बाजुकडे वळवावी.”
श्री.छत्रपती शिवाजी चौक निरा
१० जुलै रोजी रात्री २० वा. ते १५ जुलै रोजी रात्री २३ वा. यावेळेत सातारा, फलटण, लोणंद येथुन पुणेकडे जाणेसाठी जेजुरी – सासवड बाजुकडे जाणारी सर्व वाहतुक पूर्णपणे बंद करुन सदरची वाहतुक निरा-मोरगाव-सुपा केडगाव चौफुलामार्गे पुणे बाजुकडे वळवावी.
बेलसर गाव कोथळे चौक
अ) १० जुलै 26 रोजी रात्री २० वा. ते १३जुलै रोजी सकाळी ०५ वा. या वेळेत कोथळे चौक येथून सासवड बाजूकडे कोणत्याही प्रकारे वाहतुक सोडू नये.
(ब)१३जुलै रोजी सकाळी ०५ वा. ते १४ जुलै रोजी रात्री २३ वा. या वेळेत जेजुरी मार्गे सातारा, फलटण, लोणंद बाजुकडे जाणारी सर्व वाहतुक पुर्णपणे बंद करुन सदरची वाहतुक बेलसर कोथळे चौक-कोथळेगाव-नाझरे काळा ओढा मोरगाव किंवा नाझरे- पांडेश्वर मार्ग सुपा मोरगाव अशी वळवावी”
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण १४ जुलै रोजी सकाळी ०५ ते १५ जुलै रात्री २३ वा. रोजी पर्यंत बारामती बाजुकडून निरा मार्गी लोणंद बाजुकडे जाणारी वाहतुक पूर्णपणे बंद करुन निंबुत-मुरुम-काळज मार्ग लोणंद अशी वळवावी.
सासवड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण
जेजुरी नाका सासवड
१) १३ रोजी रोजीचे सकाळी ०५ वा. ते १५ जुलै रोजी रात्री २३ वा. रोजीपर्यंत पुणे बाजुकडून जेजुरी मार्ग सातारा, फलटण बाजुकडे जाणारी वाहतुक पुर्णपणे बंद करुन सासवड-नारायणपुर- कापूरहोळ मागे सातारा, फलटण किंवा सासवड-वीर फाटा परिंचे वीर-वाठार कॉलनी मार्गे लोणंद अशी वळवावी.
(२) १३ जुलै सकाळी ०५:०० वा ते १४ जुलै रोजी रात्री २३ वा. रोजी पर्यंत पुणे बाजुकडुन जेजुरी मार्गे बारामती बाजुकडे जाणारी वाहतुक पुर्णपणे बंद करुन सासवड – पारगाव मेमाणे- पिसर्वे-सुपा मार्गे बारामती अशी वळवावी.


