पुण्यनगरीतील मुक्काम सोडून माऊली निघाली सासवडच्या दिशेने
पुणे/ प्रतिनिधी
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या आषाढी वारी पालखीचे आज सकाळी पंढरपूर कडे जाताना पुण्यातून सासवड कडे प्रस्थान झाल आहे.
आळंदीहून सोहळा निघाल्या नंतर दोन दिवस माऊलींची पालखी ही पुण्यातील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामाला होती. त्यानंतर आज सकाळी सहा वाजता माऊलीच्या पालखीने सासवडच्या दिशेने प्रस्थान केल आहे. टाळ मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषात हजारो वारकरी भाविक माऊलीच्या आषाढी वारी मध्ये सहभागी झाले आहेत. माऊलींची पालखी पुण्यातून हडपसर मध्ये दाखल होणार असून त्यानंतर माऊलींची पालखी अवघड दिवे घाट मार्गे झेंडेवाडी या ठिकाणी दाखल होईल आणि तेथील विसावा उरकून सोपान काकांची नगरी सासवड येथे माऊली मुक्कामी असतील.
दरम्यान माऊलींच्या पालखीचा सोहळा दिवे घाटातून जाणार असल्याने हा मार्ग पुर्णतः बंद ठेवण्यात आला आहे.


