न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

वीज ग्राहक संघटना आणि ग्राहक पंचायत यांची संयुक्त सभा संपन्न

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग यांची तातडीची सभा आज मंगळवारी रवळनाथ मंदिर ओरोस येथे संपन्न झाली. या सभेच्या निमित्ताने वीज ग्राहक संघटनेचे पदाधिकारी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या बैठकीमध्ये जबरदस्तीने बसविण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटर च्या कारभारावर संताप व्यक्त करण्यात आला. महावितरण कडून स्मार्ट मीटर जबरदस्ती बसविण्याची प्रक्रिया थांबविण्यात येत नसेल तर भविष्यात रस्त्यावर उतरून आंदोलन करू असाही वीज ग्राहकांनी इशारा दिला. येत्या महिन्याभराच्या काळात वीज परिषदेसारखा कार्यक्रम ओरोस या ठिकाणी घेतला जाईल, असे जाहीर करण्यात आले. त्याचबरोबर जबरदस्तीने स्मार्ट मीटर लावले जात असल्याने पुढील पंधरा दिवसात आयोगाकडे लेखी तक्रार दाखल करणार असे जाहीर करण्यात आले. बैठक संपल्यानंतर जिल्हा तक्रार निवारण आयोग कार्यालय सिंधुदुर्ग येथेही भेट देण्यात आली. यावेळी वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संजय लाड, समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर, साईनाथ आंबेरकर, सरपंच संघटनेचे अध्यक्ष कसाल सरपंच राजन परब, रिक्षा संघटना सिंधुदुर्ग जिल्हाचे अध्यक्ष नागेश ओरसकर, ग्राहक पंचायत सिंधुदुर्गचे अध्यक्ष श्रीराम चव्हाण, सचिव मनोहर सरमळकर, पंचायत ग्राहक सिंधुदुर्ग जिल्हा संघटक विष्णुप्रसाद दळवी, सूर्यकांत पाटील, सुष्मिता राणे, कसाल ग्रामपंचायत सदस्य रवींद्र कसालकर व वीज ग्राहक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे