न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कोकण रेल्वेकडून जनसंवाद अभियानाचे आयोजन

कोकण रेल्वेकडून जनसंवाद अभियानाचे आयोजन.

सिंधुदुर्ग

कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गावर आज जन संवाद अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.यात कोकण रेल्वेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी विविध स्थानकात प्रवाशांशी संवाद साधला.

संपूर्ण देशात 22 ऑक्टोबर रोजी जन संवाद अभियान राबवण्यात आले.या अंतर्गत विविध रेल्वे स्थानकात अधिकारी आणि कर्मचार्यांनी स्थानकातील प्रवाशांशी थेट संवाद साधत.त्यांच्या कडून रेल्वेच्या सेवेबाबत मत जाणून घेताना रेल्वेच्या विविध उपक्रमांची माहिती प्रवाशांना दिली.कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागातही रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानकांवर सकाळपासून कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांशी हितगुज केले.अधिकाऱ्यांशी संवाद साधताना प्रवाशांनी गेल्या काही काळात रेल्वेच्या विविध उपक्रमाचे कौतुक करताना अनेक सूचना ही मांडल्या.गणेशोत्सव काळात कोकण रेल्वेने चारशे हून अधिक फेऱ्यातून मुंबई आणि महाराष्ट्रातील विविध भागातून गणेश भक्तीची जी सुरक्षित वाहतूक केली त्याचे कौतुक केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे