बुलढाणा जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी… बळीराजा सुखावला
बुलढाणा/ वृत्तसंस्था
दिवसभराच्या उकाड्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात सायंकाळी चारनंतर अनेक भागांत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. संग्रामपूर, खामगाव आणि शेगाव तालुक्यांत तासभरापासून जोरदार पाऊस सुरू असून, सलग सहाव्या दिवशी झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला असून, शेतातील कामांनाही वेग येण्याची शक्यता आहे. मात्र, काही सखल भागांत पाणी साचल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे.”


