वीज कोसळून एक महिलेचा मृत्यू तर सहाजण जखमी
अमरावती/ वृत्तसंस्था
अमरावती जिल्ह्यातील कळमजापूर येथे शेतात काम सुरू असताना अचानक वीज कोसळून सुनंदा सहारे या महिला शेतमजुराचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत अन्य सहा महिला शेतमजूर गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना तातडीने चांदूर रेल्वे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पावसाळ्यात शेतात काम करताना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.”


