चिपळूणात युवकाची वाशिष्ठी नदीत आत्महत्या
रत्नागिरी/ मेघेश मोंडकर
एक दुर्दैवी घटना रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण येथे वाशिष्ठी नदी परिसरात घडली आहे. मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या एका 40 वर्षीय युवकाने चिपळूणमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल गुरुवारी रोजी सकाळी समोर आली आहे. चिपळूण येथील गांधारेश्वर पुलावरून नदीत उडी घेऊन या युवकाने आत्महत्या केली आहे. अमित शहा असं या तरुणाचं नाव आहे. गांधारेश्वर पुलावरून वाशिष्ठी नदीत उडी घेतली या घटनेनंतर सुरू करण्यात आलेल्या शोधमोहीमेदरम्यान आज सकाळी त्यांचा मृतदेह फरशी तिठा पुलाजवळ आढळून आला. या घटनेमुळे चिपळूणसह त्यांच्या नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली असून, आत्महत्येमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.


