न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

पालकमंत्री राणे यांच्या हस्ते देवगड आगारात पाच नव्या ‘जिजाऊ’ गाड्यांचे लोकार्पण

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

     देवगड एसटी आगाराला प्राप्त झालेल्या पाच नव्या ‘जिजाऊ’ बस गाड्यांचे लोकार्पण आज शुक्रवारी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. फीत कापून बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच श्रीफळ अर्पण करून एसटी गाड्यांचे विधिवत पूजन करण्यात आले. श्रीफळ अर्पण करण्याचा मान सभापती गणेश राणे यांना मिळाला.

यावेळी माजी आमदार अजित गोगटे, विभाग नियंत्रक दीपक घोडे, संदीप साटम, बाळ खडपे, तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, सचिव योगेश चांदोसकर, वैभव कळंगुटकर, योगेश पाटकर, दया पाटील, सर्व शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख, नगरसेवक, विषय समिती सभापती, देवगड आगार व्यवस्थापक सौरभ औंधकर, यंत्र अभियंता, चालक पांडुरंग वाघमोडे, स्थानक प्रमुख डोंगरे, साई ओटवकर, घाडी, जाधव, पवार तसेच एसटीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकार्पणानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी नव्या जिजाऊ गाड्यांची पाहणी केली. या बसेस अत्यंत आरामदायी असून प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचा अनुभव मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागरिकांनी खासगी वाहनांऐवजी एसटी बससेवेचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी उपस्थित एसटी अधिकाऱ्यांशी संवाद साधताना प्रवाशांना दर्जेदार, वेळेवर आणि विश्वासार्ह सेवा देण्यावर भर द्यावा, अशा सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या. देवगड आगारात दाखल झालेल्या या पाच नव्या जिजाऊ बसांमुळे तालुक्यातील प्रवाशांना अधिक चांगली आणि आधुनिक परिवहन सेवा उपलब्ध होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे