न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मराठी शाळेत शिकून मोठे होण्यात फार मोठा अभिमान, गजानन परब

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

गावातील मराठी माध्यमांच्या शाळेत शिकून मोठे होण्यात फार मोठा अभिमान असतो. कुणकेरी येथील आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालयात मी शिकलो. या शाळेने माझ्यासारखे अनेक विद्यार्थी घडवले आहेत. तुम्ही पुढील शिक्षण असे घ्या की ज्या शिक्षणातून तुम्हाला उद्योग व्यवसाय करून मोठे होता येईल, असे आवाहन सावंतवाडी नगरपरिषदेचे अधिकारी गजानन परब यांनी विद्यार्थ्यांना केले.
कुणकेरी येथील आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालयाच्या दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गौरव समारंभाचे आयोजन शाळेत करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून या शाळेचे माजी विद्यार्थी श्री. गजानन परब बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसेवा संघ कुडाळ संस्थेचे अध्यक्ष प्रसाद रेगे, सचिव उत्तम सराफदार, शाळा समिती सदस्य शांताराम परब, पांडुरंग परब, आंबेगाव सरपंच श्री. परब, मुख्याध्यापिका सौ. अर्चना सावंत, वाडोस हायस्कूलचे मुख्याध्यापक सुहास आंबेस्कर, माजी मुख्याध्यापक भरत सराफदार, पालक श्रीमती जोशी व श्रीमती परब उपस्थित होते.
यावेळी दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेला प्रणय सिताराम परब व द्वितीय क्रमांक प्राप्त सोहम गंगाराम गावडे, तृतीय सूर्यकांत अंकुश जोशी या गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन संस्थेचे अध्यक्ष प्रसाद रेगे व सचिव उत्तम सराफदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रसाद रेगे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी प्रणय परब व सूर्यकांत जोशी यांनी सत्काराला उत्तर देताना या शाळेतील शिक्षकाने आम्हाला घडवले. आम्ही या शाळेचे ऋण कधी विसरणार नाही. आता पुढील शिक्षण घेऊन आम्ही या गावचा आणि शाळेचे नाव उज्वल करू असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. अर्चना सावंत यांनी केले. स्वागत भरत सराफदार यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यीनी सानिका कुंभार हिने केले. आभार विद्या जंगले यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे