न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडीतील वैश्यवाड्यात सहा सहस्त्र मोदकांचा नैवेद्य अर्पण

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

सावंतवाडीत वैश्यवाडा येथील श्री हनुमान मंदिरात उत्साहात सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवातील आजच्या अंगारकी संकष्टी निमित्त सामुदायिक अथर्वशीर्ष पठण व सहस्र मोदक सोहळ्यास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी सुमारे ६११२ मोदकांचा नैवेद्य ‘श्रीं’ ना अर्पण करण्यात आला.

२१ दिवसपर्यंत असणाऱ्या या गणेशोत्सवात आजच्या अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम श्री. दिक्षित भटजी यांच्या मार्गदर्शनाखाली होऊन पूजेचे मानकरी गुरुनाथ मठकर हे होते. दुपारी महाआरती होऊन श्रींना सुमारे ६११२ मोदकांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. श्री गणेशोत्सवातील अंगारकी संकष्टी असल्याने भाविकांमध्ये उत्स्फूर्त असा उत्साह दिसून येत होता. या गणेशोत्सवानिमित्त गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता कविलकाटे कुडाळ येथील महिला मंडळाचा बहारदार फुगड्यांचा कार्यक्रम होणार आहे.

रविवार दि. ४ ऑक्टोबर रोजी भव्य अशा विसर्जन मिरवणुकीने या गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. यावेळी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे