न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

वाफोली विलवडे येथील क्वारीज् व क्रशर्स बंद करा, डॉ.जयेंद्र परुळेकर

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

सावंतवाडी तालुक्यातील वाफोली विलवडे गावांमध्ये लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या बॅक वाॅटर लगत असलेल्या तीन ते चार क्वारीज् (दगडखाणी) आणि पाच सहा क्रशर्स कायम स्वरूपी बंद करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी केली आहे. या खाणींबाबत वाढत असलेला जनप्रक्षोभ पहाता तहसीलदार सावंतवाडी यांनी तात्पुरत्या स्वरूपात सदर क्वारीज् आणि क्रशर्स बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत . पण एखाद्या धरण प्रकल्पाच्या एवढ्या जवळ असलेल्या अशा प्रकल्पांना मुळात परवानगी मिळालीच कशी? आणि ही परवानगी कोणी दिली? याची कसून चौकशी करावी अशी मागणी डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केली आहे.
सावंतवाडी तालुक्यातील वाफोली विलवडे गावांमध्ये लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या बॅक वाॅटर लगत असलेल्या तीन ते चार क्वारीज् (दगडखाणी) आणि पाच सहा क्रशर्स या विरोधात ग्रामस्थांनी आणि महिलांनी मंगळवारी एल्गार पुकारला. लघुपाटबंधारे धरणापासून नजिकच्या अंतरात असलेल्या या दगडखाणींमध्ये दिवसाच नव्हे तर रात्री मध्यरात्री ब्लास्टिंग केले जाते. एकामागोमाग एक अशा पाच सहा क्रशर्स मधून मोठ्या प्रमाणावर धुळ आसमंतात पसरत आहे. क्रशर्सच्या मशिनरींच्या आवाजाने ग्रामस्थांची झोप उडालेली आहे.अनेक वृद्ध ग्रामस्थांना, लहान मुलांना आणि महिलांना रक्तदाब,दमा असे आजार जडलेले आहेत. याबाबत कालच श्री. श्रीधर पाटील, तहसीलदार सावंतवाडी यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. यावेळी उपस्थित असलेल्या डॉ. परूळेकर यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली
वाफोली विलवडे गावालगत भालावल हे इको सेन्सिटिव्ह गाव आहे.अशा भागात दगडखाणी असणे हे वन्यजीवांसाठी देखील धोकादायक आहे. वन्यजीव (गवे रेडे,सांबर इत्यादी) यांचे विस्थापन होऊन ते आसपासच्या बागायती शेती क्षेत्रात आणि गावातच काय पण शहरी भागात देखील दिसून येत आहेत त्याची हीच कारणे आहेत.
लघुपाटबंधारे क्षेत्रात दगडखाणी, क्रशर्स सुरू आहेत. मग पाटबंधारे खाते काय करत होते? ही देखील चौकशी होणे गरजेचे आहे. असे डॉ. परूळेकर यांनी म्हटले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे