जालन्यात गॅस सिलेंडर गोदामातून ११० सिलिंडर चोरीला
जालना/
जालन्यातील उटवद शिवारातील एका गॅस एजन्सीच्या गोडाऊन मधून तब्बल 110 गॅस सिलेंडर चोरीला गेले आहे. उटवद शिवारातील आनंद भारत गॅस एजन्सीच्या गोडाऊन मधून 96 घरगुती गॅस सिलेंडरसह 12 व्यावसायिक वापराचे गॅस सिलिंडर आणि दोन पाच किलोचे व्यावसायिक गॅस सिलेंडर चोरीला गेले आहेत.या प्रकरणी सिद्धार्थ आढाव यांच्या फिर्यादीवरून मौजपुरी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


