महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वराचं मंदिर दर्शनासाठी २४ तास खुलं राहणार
नाशिक/
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वराचं मंदिर भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुलं राहणार आहे. महाशिवरात्रीला रविवारी पहाटे ४ वाजेपासून ते सोमवारी रात्री ९ वाजेपर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं राहणार आहे. भाविकांची संभाव्य गर्दी आणि येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या सुलभ दर्शनासाठी मंदिर प्रशासनाने निर्णय घेतला आहे. महाशिवरात्रीला व्हीआयपी प्रोटोकॉल दर्शन, देणगी दर्शन आणि गर्भगृह दर्शन देखील पूर्णपणे बंद राहणार आहे.


