देवगडात दुचाकीची कारला धडक …दोघे गंभीर
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
उभ्या असलेल्या कारला दुचाकीस्वाराने मागून ठोकरल्याने झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी ३ वाजता देवगड जामसंडे मार्गावर घडली .
पशीवैदयकीय अधिकारी एका दुकानात वस्तू खरेदी साठी कार पार्किंग करून गेले असता वेगाने येत दुचाकीस्वाराने कारला मागून ठोकरले. यात दोघेही उडून रस्त्यावर आदळून गंभीर जखमी झाले. घटनास्थळी पोलीसांनी धाव घेत दोघांनाही रूग्णालयात दाखल केले.


