न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

आपल्या कॉलेजमधून लेखक घडले याचा मला अभिमान, राजेसाहेब खेमसावंत भोसले 

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

     बाळकृष्ण राणे यांच्यासारखे लेखक आपल्या कॉलेजमधून घडले याचा मला अभिमान आहे. आपल्या कॉलेजमधील माजी विद्यार्थी अशाप्रकारे यश मिळवत असल्याचा आनंद मला होत आहे. श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या रजिस्टरमध्ये अशा वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या साहित्यिकांची नोंद घेतली जाईल असे प्रतिपादन राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोसले यांनी केले.

सावंतवाडी येथील ज्येष्ठ लेखक बाळकृष्ण सखाराम राणे यांच्या ‘सुंदरवाडी मधाळ स्वप्नांचे गाव ‘ या ललितलेखांच्या पुस्तकाचे प्रकाशन श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीच्या सभागृहात आज शनिवारी मान्यवरांच्या हस्ते पार पडले. यावेळी अध्यक्षस्थानावरून राजेसाहेब खेमसावंत भोसले बोलत होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सुधाकर ठाकूर, कोमसाप शाऐ सावंतवाडीचे अध्यक्ष दीपक पटेकर, निवृत्त प्रा. एम व्ही कुलकर्णी, प्रा.फातर्पेकर, प्रा.सुभाष गोवेकर, प्रा. गोडकर, जयप्रकाश सावंत, प्रा.शिंत्रे, निवृत्त पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस, लेखक बाळकृष्ण राणे, सौ.राणे, विनय सौदागर, सौ. संजना परब आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजक १९८२ सायन्स बॅचच्या वतीने हेमंत झांट्ये, ॲड. गावकर, धरणे, सौ.सुखदा पेडणेकर, सौ.सुप्रिया गोडकर, सौ.अपर्णा झांट्ये, सौ. गीता धरणे, सौ.शैलजा शिरोडकर, सौ.संपदा देसाई, सौ.ऋग्वेदिता देसाई यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक प्रा.गोडकर यांनी केले. दीपक पटेकर यांनी बाळकृष्ण राणे हे कोमसाप सदस्य असल्याचा आपल्याला अभिमान वाटतो, असे सांगताना ललित लेखन म्हणजे काय? यावर प्रकाश टाकला.

‌ डॉ. सुधाकर ठाकूर यांनी प्रथम ललित या विषयावर मार्गदर्शन केले आणि राणे यांच्या पुस्तकातील सावंतवाडीसह सावंतवाडीतील व्यक्तिचित्रणे, स्थळ यांची दिलेली माहिती हा महत्त्वाचा दस्तऐवज असून त्याचे पुस्तकाच्या माध्यमातून संवर्धन, जपणूक झाली पाहिजे असे मत व्यक्त केले.

यावेळी प्रा. एम व्ही कुलकर्णी, प्रा. सुभाष गोवेकर, प्रा. फातर्पेकर यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहित्यिक विनय सौदागर यांनी केले तर आभार प्रदीप पेडणेकर यांनी मानले. यावेळी श्री गोठोस्कर, अभय पंडित, प्रा. मर्गज, म्हसकर सर, अण्णा देसाई, सावंतबिर्जे, सुनील कोरगावकर, आरिफा शेख, संतोष मुंज, सुधीर शिरोडकर, नंदकुमार देसाई, अरुण देसाई यांच्यासह १९८२ बॅचचे विद्यार्थी, सुंदरवाडी ग्रुपचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1/5 - (1 vote)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे