न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सांगलीच्या भाजपा आमदारांच्या गाडीला अपघात.. आमदारांसह पाच जण जखमी

सांगली/ वृत्तसंस्था

सांगलीचे भाजपा आमदार सुधीर गाडगीळ यांच्या गाडीला अपघात झाला आहे. सांगलीच्या रत्नागिरी नागपूर महामार्गावर हा अपघात झाला असून यामध्ये आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह चार ते पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. तर एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. कर्नाटकाच्या उगार येथून सांगलीकडे परतत असताना मिरज जवळ रत्नागिरी-नागपूर महामार्गावर हा अपघात झाला आहे. यामध्ये गाडगीळ यांच्या चारचाकी गाडीच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. दुचाकीला धडकल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज असून अपघातामध्ये आमदार सुधीर गाडगीळ यांच्या बोटाला मार लागला आहे. तर गाडगीळ यांच्या वाहनाचे चालक,स्वीय सहायक,अंगरक्षकासह चौघेजण किरकोळ जखमी झाले असून त्यांची प्रकृती ठीक आहे. गंभीररित्या जखमी असणाऱ्या दुचाकीस्वराला मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे