सावंतवाडी तालुक्यातील परिवाराचा म्हापस्यात आत्महत्येचा प्रयत्न…वडीलांसह मुलाचा मृत्यू..आई गंभीर
म्हापसा/ वृत्तसंस्था
करासवाडा साईनगर मध्ये सामुहिक आत्महत्येच्या प्रयत्नात वडीलांसह सात वर्षीय मुलाचा मृत्यू तर आई गंभीर झाल्याची घटना घडली आहे. सदर कुटुंब सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील असल्याचे समजते. या आत्महत्ये बाबत संशय व्यक्त होत आहे.
दोन दिवसांपूर्वी अजय याने वडिलांना गावी फोन करून मुलगा व बायकोला झोप येत नाही असे सांगितले होते. त्यावर देवीच नाव घेऊन अंगारा लाव असे त्यांनी सांगितले…आज सकाळी ते फोन लावत होते…तो उचलला नाही म्हणून ते घरी आले तर तिघेही निपचित पडल्याचे दिसले तर सुनेची हाताची नाडी सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने तिला बांबोळीत उपचारासाठी दाखल करण्यात आले.



