न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मुंबई-गोवा महामार्गावर नेमळे येथे अपघात, दोन महिलांचा मृत्यू, तीन गंभीर जखमी

सिंधुदुर्ग / राजू तावडे

मुंबई-गोवा महामार्गावर नेमळे येथील एरंडवाकवाडी परिसरात आज दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास मोठा अपघात झाला. यात थार कारचा चक्काचूर होऊन दोन महिला ठार झाल्यात. तर तीघे गंभीर जखमी झाले आहेत.
गोवा सालीगाव गिरी येथून कणकवली भिरवंडे येथे जात असताना हा अपघात घडला. यातील जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून गोवा-बांबोळी येथे अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार जीए- ०३- एएम – ८४७८ क्रमांकाची थार कार नेमळे मार्गावरून कणकवली येथे जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. वाहनाचा वेग जास्त असल्याने कार रस्त्याबाहेर जाऊन धडकली. या अपघातात श्रीमती नानोडकर (वय ५८, रा‌. गिरी- गोवा ), विलासिनी सातार्डेकर (वय ५४, रा‌. भिरवंडे-कणकवली) गंभीर जखमी झाल्या. उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे उपचारा दरम्यान त्यांना मृत घोषित करण्यात आले. तर चालक सनी नानोडकर (वय ३६, रा‌‌. गिरी गोवा), उज्वला कांबळी (वय ४८, रा. गिरी गोवा), पांडुरंग नानोडकर ( वय ६५, रा. गिरी गोवा ) हे जखमी असून उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना गोवा- बांबोळी येथे हलविण्यात आले. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची रूग्णवाहिका व १०८ रुग्णवाहिकेने रुग्णांना हलविण्यात आले‌‌. या अपघातग्रस्तांवर प्र. वैद्यकीय अधिक्षक डॉ. संदीप सावंत, डॉ. गिरीश चौगुले, डॉ. निखील अवधूत, परिचारिका श्रीम. गोसावी, श्रीम‌‌. नाईक आदींनी प्राथमिक उपचार केले.
नेमळे येथे घडलेल्या या अपघातावेळी पोलिस हेड कॉन्स्टेबल हनुमंत धोत्रे, मनोज राऊत, प्रिया नाईक, निलेश नाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली. सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस व नेमळे येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मतदतकार्य सुरू केले. स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने जखमींना वाहनातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे दाखल करण्यात आले. यावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा‌. सतीश बागवे, शैलेश नाईक, रवी जाधव, लक्ष्मण कदम,रूपा मुद्राळे यांनी तसेच रुग्ण कल्याण समितीचे सदस्य देव्या सुर्याजी यांच्याकडून अपघत ग्रस्तांच्या कुटुंबाला धीर देत मदत करण्यात आली. यावेळी रुग्णालयातील उपचारांबाबत रुग्ण कल्याण समितीचे सदस्य श्री. सुर्याजी, रवी जाधव यांनी नाराजीही व्यक्त केली. यावेळी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी रुग्णालयात भेट देत पुढील कार्यवाही केली. मयत दोघांवर पुढील सोपस्कार पार पाडले जात असून अधिक तपास सावंतवाडी पोलिस करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे