न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

जन्म नोंद दाखले मिळण्यास विलंब; नागरिकांमध्ये असंतोष – माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर

सावंतवाडी / मनोज घाटकर

मागील दोन आठवड्यांपासून जन्म नोंद दाखले मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असल्याची प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केली आहे.
याबाबत प्रशासनाकडे विचारणा केली असता, सीआरएस (Civil Registration System) पोर्टल अद्ययावत (अपडेट) करण्याचे काम सुरू असल्यामुळे दाखले देण्यास विलंब होत असल्याचे कारण सांगण्यात आले. मात्र, जन्म नोंद दाखला हा नागरिकांचा मूलभूत हक्क असून तो तात्काळ मिळणे आवश्यक असल्याचे साळगावकर यांनी स्पष्ट केले.
सध्या शाळा व महाविद्यालयांचे प्रवेश सुरू असून पासपोर्ट, आधार कार्ड तसेच विविध शासकीय व निमशासकीय कामांसाठी जन्म नोंद दाखला अत्यावश्यक आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून दाखले मिळत नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून त्यांच्यात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चौकशीअंती सीआरएस पोर्टलचे अद्ययावतीकरण संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. हे काम आवश्यक असले तरी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी साळगावकर यांनी केली आहे.
पूर्वीप्रमाणे जन्म नोंदीची पडताळणी रजिस्टरमधून करून लेखी दाखले देण्याची पद्धत तात्पुरत्या स्वरूपात पुन्हा सुरू करावी. ज्यांच्या नोंदी उपलब्ध आहेत, अशा नागरिकांना रजिस्टर तपासून त्वरित लेखी जन्म नोंद दाखले देण्यात यावेत, जेणेकरून शैक्षणिक व इतर महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होणार नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे.
शासन व संबंधित प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे