न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडी माठेवाडा येथील अंगणवाडीत जागतिक योग दिन साजरा 

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

   “योगामुळे शरीर स्वास्थ्य उत्तम राहते. योग ही आपल्या भारताच्या ऋषीमुनींनी जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. आज संपूर्ण जगाने योगाचे महत्त्व स्वीकारले असून, प्रत्येकाने निरोगी आरोग्यासाठी दररोज योगसाधना करणे गरजेचे आहे. योगाच्या नियमित सरावामुळे अनेक रोग आणि व्याधी दूर होतात,” असे आवाहन योग शिक्षिका रोहिणी बांदेकर यांनी केले.

पाचव्या जागतिक योग दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी माठेवाडा येथील अंगणवाडीतील तीन वर्षांच्या छोट्या चिमुरड्यांपासून ते प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी एकत्र येत अतिशय उत्साहात योग साधना करून आज रविवारी हा दिवस साजरा केला.

या कार्यक्रमाचे नियोजन अंगणवाडी क्र.१५ व कै.सुधाताई वामनराव कामत जि.प.शाळा व माठेवाडा सावंतवाडीचे मुख्याध्यापक तेजस बांदिवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी शिक्षिका भावना गावडे, पूजा ठाकूर, रणजीत सावंत, हेमांगी जाधव आणि प्राची ढवळ यांनी विद्यार्थ्यांना योगाचे विविध प्रकार प्रात्यक्षिकांसह समजावून सांगितले. तसेच अंगणवाडी सेविका अनुराधा पवार आणि अंगणवाडी मदतनीस अमिषा सासोलकर यांनीही चिमुरड्यांना योगसाधना सुलभतेने करता यावी यासाठी विशेष सहकार्य केले.

या योग दिनाच्या कार्यक्रमात अंगणवाडीमधील छोट्या मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. यामध्ये राहील शेख, पूजा शिर्के, अद्विक पाटील, वेदा जाधव, प्राप्ती गवळी, श्री नेवगी, सार्थक नेवगी, स्निग्धा प्रभू, ‌इशिता कडगावकर व चिन्मय कालेलकर या चिमुरड्यांसह पाचवीतील विद्यार्थी अद्विक पाटील याचा प्रामुख्याने समावेश होता.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे