न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

सिंधुदुर्ग / राजू तावडे

   यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन आज मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम व ध्यानाचे प्रात्यक्षिक सादर करून योगाचे महत्त्व अधोरेखित केले. यावर्षीच्या “योगा फॉर हेल्दी एजिंग” या संकल्पनेनुसार निरोगी, सक्रिय व संतुलित जीवनासाठी योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.

कार्यक्रमात क्रीडा शिक्षक जयेश परब व पीटी मास्टर दिपाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध योगासने व प्राणायाम सादर केले. योग्य श्वसन पद्धती, शरीराची ठेवण आणि दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्याचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅडेट पूर्वी हिने केले. कॅडेट जिज्ञासा हिने योगाचा इतिहास, जागतिक स्तरावरील महत्त्व आणि आरोग्यदायी जीवनशैलीतील योगदान याविषयी माहिती दिली. कॅडेट सर्वेश याने शिस्तबद्ध आदेश देत संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी संचलन केले. सैनिक स्कूलच्या परंपरेनुसार विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली.

यावेळी शाळेचे प्राचार्य सॅव्हीओ फर्नांडिस, उपमुख्याध्यापिका अवंतिका नाईक, अकॅडमिक को-ऑर्डिनेटर श्वेता खानोलकर, मंजिरी राऊळ, संदीप धुरी, जयेश परब, दिपाली पाटील तसेच निवृत्त सुभेदार दिलीप पोवार उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये योगाबाबत जागरूकता निर्माण झाली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे