वर्धा… स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी त्रिपलसीट शाळेत जाताना बसला धडकून तिनं विद्यार्थ्यिंनींचा मृत्यू
देशभर स्वातंत्र्यदिनाचा आनंद असताना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरातून एक अत्यंत काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. हिंगणघाट शहरातील आंबेडकर शाळेजवळ एका भरधाव ट्रॅव्हल्सने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच हिंगणघाट शहरावर भीषण शोककळा पसरली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, समृद्धी धामसे, आरुही चवरे आणि मिसबा शेख अशी अपघातात मृत्यू झालेल्या शाळकरी मुलींची नावे आहेत.”
समृद्धी धामसे, आरुही चवरे आणि मिसबा शेख या तिन्ही मुली दुचाकीवरून स्वातंत्र्यदिनासाठी जात होत्या, त्याचवेळी आंबेडकर शाळेजवळ मागून येणाऱ्या भरधाव खासगी ट्रॅव्हल्स बसने दोरात धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की धडक बसताच तिन्ही मुली रस्त्यावर फेकल्या गेल्या अन् गंभीर जखमी झाल्या. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून जखमी मुलींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान या तिन्ही निष्पाप मुलींची प्राणज्योत मालवली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


