भिवंडीत इमारत कोसळून सात जणांचा मृत्यू
कल्याण/ वृत्तसंस्था
राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. यातच भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील बालाजी नगर-गंगारामवाडी येथील कोहिनूर अपार्टमेंट ही तळ अधिक 4 मजली अतिधोकादायक ठरवलेली इमारत गुरुवारी (30 जुलै) रात्री 11.30 वाजताच्या सुमारास कोसळली.
या घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 2 जण अडकल्याची माहिती भिवंडी महानगरपालिका आणि एनडीआरएफने दिली आहे.
या घटनेची माहिती मिळतात पालिका आपत्कालीन कक्ष, अग्निशामक दलाचे जवान , एनडीआरएफ आणि टीडीआरएफची टीम रात्री 11.45 वाजल्यापासून घटनास्थळी दाखल झाली असून शोध मोहीम सुरू आहे


